रेश्मा शिंदेच्या नवऱ्याचं नाव काय? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 09:22 AM2024-11-29T09:22:47+5:302024-11-29T10:20:29+5:30

रेश्मा शिंदेचा नवरा आहे तरी कोण ?

'घरोघरी मातीच्या चुली'मधली जानकी असो किंवा 'रंग माझा वेगळा'मधली दीपा अभिनेत्री रेश्मा शिंदे महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.

आता रेश्मा शिंदे आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

तिचा घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली असून नुकताच तिचा मेहंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रेश्माने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केळवण आणि मेंहदी सोहळ्यात तिने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर केला नव्हता.

ती नेमकं कुणाशी लग्न करतेय, ही बाब गुलदस्त्यातच होती. पण, आता हळदीच्या दिवशी रेश्माने तिच्या नवऱ्याचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.

पारंपारिक पद्धतीने रितीरिवाजानूसार रेश्माचा हळदी सोहळा पार पडला. त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रेश्माने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केले आहेत. त्याच्या प्रोफाइलवरुन त्याचे नाव पवन असल्याचे समोर आले.

पण, तो नेमकं काय काम करतो, हे अद्याप उघड झालेले नाही. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याविषयी इतर तपशील अद्याप उपलब्ध नाही.

रेश्मा ही आज २९ नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. या लग्न सोहळ्यात मनोरंजन विश्वातील कोण कोण मंंडळी उपस्थित राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.