Rohit Mane : 'हास्यजत्रा' फेम रोहित माने बायकोसोबत इंटिमेट, PHOTOS व्हायरल; चाहत्यांनी सुनावले खडेबोल By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 9:28 AM1 / 10आपल्या पार्टनरसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करणं सध्याचा ट्रेंडच झालाय. मग ते बॉलिवूड, हॉलिवूडच नाही तर मराठी कलाकारही यात मागे नाहीत.2 / 10'हास्यजत्रा' फेम वनिता खरातने काही दिवसांपूर्वीच तिने प्रिवेडिंग फोटो पोस्ट केले होते. यामध्ये तिने नवऱ्यासोबत अनेक रोमॅंटिक पोज दिल्या आहेत.3 / 10तर वनिता नंतर आता हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित माने यानेही पत्नीसोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही अवाक झालेत.4 / 10रोहितने २ वर्षांपूर्वीच १२ फेब्रुवारी रोजी श्रद्धा किर्वे हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करताना त्याने हे खास फोटो शेअर केलेत.5 / 10रोहितच्या फोटोंकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे एका फोटोत रोहित आणि श्रद्धा लिपलॉक करताना दिसत आहेत. या फोटोमुळे काही मराठी लोकांनी मात्र रोहितला खडेबोल सुनावले आहेत.6 / 10'भावा जोडी एकदम कडक पण किसिंग फोटो टाकलात ते नाही आवडलं'अशी एक प्रांजळ कमेंट चाहत्याने केली आहे.' तर 'किसिंग फोटो टाळावेत' असा सल्ला एका चाहत्याने दिला आहे.7 / 10मात्र रोहितने कशाचीही पर्वा न करता मोकळेपणाने बायकोवरचे प्रेम व्यक्त केले आहे. 'बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लव्ह यू.' असं सुंदर कॅप्शनही त्याने दिले आहे.8 / 10रोहित अन् श्रद्धाची जोडी खूपच गोड दिसत आहे. एका बीचवर त्यांनी हे खास फोटोशूट केलेले दिसते.श्रद्धाने फिक्या निळ्या रंगाची साडी नेसली आहे तर रोहितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे.9 / 10तर श्रद्धानेही खास व्हिडिओ आणि फोटो शेअर करत रोहितला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंवर वनिता खरातने 'किती गोड' अशी कमेंट केली आहे.10 / 10रोहित अन् श्रद्धाने याआधीही असे इंटिमेट फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकली तर सुंदर ठिकाणी काही खास क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications