Ruhaanika Dhawan: ‘ये है मोहब्बतें’मधील क्यूट रुही झाली मोठी, आता दिसते खूप सुंदर, पाहा तिचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:57 IST
1 / 8‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही मालिकेने एकेकाळी खूप लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत रुहीची भूमिका करणाऱ्या रुहानिका धवन ही सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत तिने दिव्यांका त्रिपाठी म्हणजे इशिता आणि करण पटेल म्हणजेच रमन भल्ला यांच्या मुलीची भूमिका केली होती. त्यावेळी खूप क्यूट दिसणारी रुहानिका केवळ ६-७ वर्षांची होती. आता ती मोठी झाली असून, तुम्ही तिला कदाचित ओळखूही शकणार नाही. 2 / 8‘ये है मोहब्बतें’ मालिका बऱ्याच वर्षांपूर्वी संपली होती. मात्र त्या मालिकेतील स्टारकास्ट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. रुहीसुद्धा अजूनही लोकांच्या आठवणीत आहे. 3 / 8‘ये है मोहब्बतें’मधील रुही अर्थात रुहानिका धवन ही इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे तब्बल १.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 4 / 8रुहानिकाने अनेकदा सांगितले आहे की, ती अजूनही दिव्यांका त्रिपाठीच्या संपर्कात असते. तसेच तिच्यावर खूप प्रेम करते. 5 / 8 त्या काळात लोकांच्या मनात घर करणारी छोटीशी रुही आता खूप मोठी झाली आहे. रुहानिका आता खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते. 6 / 8रुहानिका सोशल मीडियावर सातत्याने तिचे जुने फोटो शेअर करत असते. 7 / 8तसेच रुहानिका ही आता आधीपेक्षा खूप वेगळी दिसते. आता ती तरुण आणि सुंदर दिसते. तसेच फॅन्सही तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत असतात. 8 / 8रुहानिका अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तसेच तिने काही ब्रँड्सच्या जाहीरातींमध्येही काम केले आहे.