500 कोटी दावणीला! 'या' 6 चुकांमुळे Bigg boss 15 च्या TRP मध्ये घसरण By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 5:00 PM1 / 10छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. यंदा या शोचं १५ वं पर्व असून टीआरपीमध्ये ते मागे असल्याचं पाहायला मिळत आहे.2 / 10बिग बॉस १३ चं पर्व सुपरहिट ठरलं होतं. यात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्यामुळे ते सर्वाधिक चर्चिलं गेलं होतं. परंतु, त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हा शो टीआरपीमध्ये मागे असल्याचं दिसून येत आहे.3 / 10यंदाचं पर्व गाजावं यासाठी मेकर्सने तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. सलमान खानची फी, शोचा सेटअप, स्पर्धकांचं मानधन हे सारं मिळून ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील हे पर्व फारसं लोकप्रिय होताना दिसत नाही.4 / 10बिग बॉस १५ सुरु झाल्यानंतर २ आठवडे चर्चेत राहिलं. परंतु, आता पुन्हा ते टीआरपीमध्ये मागे पडत चालल्याचं दिसून येत आहे. मात्र, यंदाचं पर्व टीआरपीमध्ये मागे असण्यामागे काही खास कारणं आहेत. ही कारणं कोणती ते पाहुयात.5 / 10लव्ह अॅगलवर सर्वाधिक फोकस - यंदाच्या पर्वात घरात रंगणाऱ्या टास्कपेक्षा प्रेम प्रकरणं अधिक गाजत आहेत. पहिल्या आठवड्यात मायशा-इशान सहगल यांचं प्रकरण चर्चेत आलं. त्यानंतर आता तेजस्वी प्रकाश- करण कुंद्रा, शमिता शेट्टी- राकेश बापट यांची चर्चा होत आहे. राकेश- शमिताचं प्रेम प्रकरण बिग बॉस ओटीटीवरही गाजलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांना आवडलेलं नाही.6 / 10लाइव्ह फिडचं होत असलेलं नुकसान - अनेकांच्या मते, लाइव्ह फिडमध्ये अनेकदा जुना कंटेंट लोकांना दाखवला जातो. त्यामुळे आता या गोष्टीला प्रेक्षक कंटाळले आहेत.7 / 10ओटीटीवर वाइल्ड कार्ड्स - बिग बॉस ओटीटी अपयशी ठरलं होतं. मात्र, तरीदेखील मेकर्सने या ओटीटीवरील ५ स्पर्धकांना बिग बॉस १५ मध्ये सहभागी करुन घेतलं. यात निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल आणि शमिता शेट्टी पुन्हा एकदा बिग बॉस १५ मध्ये झळकले. त्यातच आता नेहा भसीन आणि राकेश बापटही या पर्वात दिसून येत आहेत. त्यामुळे ओटीटीवर अपयशी ठरलेल्या स्पर्धकांना पुन्हा या शोमध्ये पाहणं प्रेक्षकांना पसंत नाही.8 / 10खोटे नातेसंबंध - सध्या घरात वावरत असलेल्या कोणत्याही स्पर्धकांमध्ये खरं नातं पाहायला मिळत नाही. प्रत्येक स्पर्धक आपल्या स्वार्थासाठी एकमेकांशी मैत्री करत आहे. त्यामुळे कधी वाद, कधी आपुलकीची भावना असं खोटंखोटं मिरवणाऱ्या स्पर्धकांचा प्रेक्षकांना राग येऊ लागला आहे.9 / 10कंटाळवाणे टास्क - प्रेक्षकांच्या मते, सध्या स्पर्धकांना देण्यात येणारे टास्क अत्यंत कंटाळवाणे आहेत. ज्यामुळे शो पाहण्याची इच्छा होत नाही.10 / 10कॅमेरा कॉन्शिअस स्पर्धक - घरात वावरणारा प्रत्येक स्पर्धक कॅमेरा असल्यामुळे खोटे मुखवटे घेऊन वावरत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सगळ्याला कंटाळले आहेत. परिणामी, या सगळ्याचा परिणाम शोच्या टीआरपीवर होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications