संस्कृती जपणारी आदर्श जोडी! लघाटेंकडे अशी पार पडली श्रावणातील पूजा; मुग्धा-प्रथमेशचं होतंय कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 4:44 PM1 / 8मुग्धा-प्रथमेशने आपल्या सुमधूर सुरांनी सर्वच प्रेक्षकांना भुरळ घातली. 2 / 8गतवर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली.3 / 8दोघंही आपल्या मराठी संस्कृतीला जपतात आणि हे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा जाणवतं. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.4 / 8सध्या श्रावण महिना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लघाटेंच्या घरी श्रावणातील पूजा पार पडली. 5 / 8मुग्धाने याचे काही खास फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. 6 / 8या पूजेसाठी मुग्धा लाल रंगाची साडी नेसली आहे तर प्रथमेशने पितांबर परिधान केला आहे. 7 / 8मुग्धा-प्रथमेशचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यांचा पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.8 / 8या फोटोंवर 'संस्कृती जपणारी ,सर्वांना आपलं करणारी जोडी' अशी कमेंट एक नेटकऱ्याने केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications