Join us  

Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:29 PM

1 / 11
सरगुन मेहता पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठी स्टार आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्माती देखील आहे. तिने पती रवी दुबेसोबत अनेक शो केले आहेत.
2 / 11
उडारियां, स्वर्ण घर, जुनूनियत, दालचीनी, बादल पे पांव है यांचा समावेश आहे. या सर्व शोला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.
3 / 11
अभिनेत्री नेहमीच आपलं मत उघडपणे मांडत असते. मग ते मत प्रोफेशनल लाईफबाबत असो की पर्सनल आयुष्याबाबत.
4 / 11
सरगुनने Hauterrfly शी केलेल्या संवादात सांगितले होतं की, तिला कॉलेजमध्ये असताना तिला डेटिंग, प्लेजर आणि सेक्स नॉलेज याबाबत अजिबात समज नव्हती.
5 / 11
'मला अजिबात समज नव्हती. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा मला असं वाटायचं की, किस केल्यामुळे मुलं होतात.'
6 / 11
'मला बेसिक बायोलॉजीही माहीत नव्हती. पार्टनरसोबत बोलल्यानंतरच तिला या सर्व गोष्टी कळल्या' असं सरगुनने सांगितलं.
7 / 11
अभिनेत्रीने '12/24 करोल बाग', 'फुलवा', 'बालिका वधू', 'क्या हुआ तेरा वादा', 'रिश्तों का मेला' सारखे टीव्ही शो केले आहेत.
8 / 11
पंजाबी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर सरगुन 'किस्मत', 'किस्मत 2', 'अंग्रेज', 'मोह', 'झल्ली'मध्ये दिसली आहे. तिने अनेक हिट पंजाबी म्युझिक व्हिडीओ केले आहेत.
9 / 11
अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
10 / 11
सरगुन मेहताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
11 / 11
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन