Join us  

कुणीतरी येणार येणार गं! हिरवी साडी अन् फुलांचा साज; नेत्राचे डोहाळ जेवणाचे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 3:52 PM

1 / 7
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
2 / 7
या मालिकेचं कथानक इतरांपेक्षा वेगळं असल्यामुळे तिला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
3 / 7
सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका एक रंजक वळणावर आहे. या मालिकेत नेत्रा गरोदर असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
4 / 7
अभिनेत्री तितिक्षा तावडेने मालिकेत नेत्रा नावाचं पात्र साकारलं आहे. लवकरच अद्वैत आणि नेत्राच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
5 / 7
सध्या इंटरनेटवर नेत्राच्या डोहाळ जेवणाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
6 / 7
या फोटोंमध्ये हिरवी साडी आणि त्यावर फुलांचा साज असा पेहराव तिने केला आहे.
7 / 7
नेत्राच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :तितिक्षा तावडेटेलिव्हिजनसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्