Join us  

बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'वंडर गर्ल'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 5:25 PM

1 / 7
सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची चांगलीच चर्चा आहे. वर्षा उसगावकर सर्व स्पर्धकांच्या खांद्याला खांदा लावून चांगला खेळ दाखवत आहेत
2 / 7
वर्षा उसगावकर गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. वर्षा यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय
3 / 7
वर्षा उसगावकर यांच्या जुन्या फोटोंवर नजर टाकली तर त्यांना महाराष्ट्राची वंडर गर्ल का म्हटलं जातं याचा अनुभव होईल (सौजन्य: लेहरे टीव्ही)
4 / 7
वर्षा उसगावकर यांचे जुने फोटो अत्यंत ग्लॅमरस असलेले पाहायला मिळतात. वर्षा दिसायला किती सुंदर आहेत हे या फोटोंवरुन लक्षात येतं
5 / 7
वर्षा उसगावकर यांनी अभिनय केलेले सवत माझी लाडकी, गंमत जंमत, आत्मविश्वास हे सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष आवडीचे आहेत
6 / 7
वर्षा उसगावकर यांनी काहीच दिवसांपूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अभिनय केला. या मालिकेत त्यांनी साकारलेली माईंची भूमिकाही चांगलीच गाजली
7 / 7
वर्षा उसगावकर यांचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे. वर्षा उसगावकर बिग बॉसचं घर कसं गाजवतात याकडे सर्वांचं लक्ष आहे
टॅग्स :बिग बॉस मराठीवर्षा उसगांवकरकलर्स मराठीरितेश देशमुख