घरातील वस्तू विकून अभिनेत्याने केला वडिलांवर उपचार; 3 वर्ष काम न मिळाल्यामुळे झाला होता बेकार By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 8:59 AM1 / 9छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शोएब इब्राहिम. उत्तम अभिनयामुळे आणि पर्सनालिटीमुळे शोएब कायमच चर्चेत येत असतो.2 / 9कलाविश्वासह शोएब सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. त्याचं एक युट्यूब चॅनेलदेखील आहे.3 / 9शोएब गेल्या काही दिवसांपासून पत्नी दीपिकाच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहे.4 / 9छोट्या पडद्यावर शोएबचा आज दरारा आहे. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी त्याच्याकडे काहीच काम नव्हतं.5 / 9एका मुलाखतीमध्ये शोएबने त्याच्या हालाखीच्या दिवसांविषयी भाष्य केलं. यात वडिलांच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते.6 / 9'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे चर्चेत आलेल्या शोएबने ही मालिका सोडली. त्यानंतर ३ वर्ष त्याच्याकडे काम नव्हतं.7 / 9'ससुराल सिमर का ही मालिका सोडताना मला प्रचंड टेन्शन आलं होतं. कारण त्यावेळी ती मालिका खूप लोकप्रिय होती. ही मालिका सोडल्यानंतर जवळपास ३ वर्ष माझ्याकडे काम नव्हतं. पण, आयुष्यात काही करायचं असेल तर रिस्क घेतलीच पाहिजे असं माझं मत होतं. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण असणार होता याचीही मला जाणीव होती, असं शोएब म्हणाला.8 / 9पुढे तो म्हणतो, घरची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. मालिका सोडल्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे मी खरेदी केलेली कार मला विकावी लागली. कार विकून आलेल्या पैशात मी वडिलांवर उपचार केले.9 / 9शोएबने मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याचा आज मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications