Join us

Shweta Tiwari: सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचली श्वेता तिवारी, पाहून नेटिझन्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 11:19 IST

1 / 6
अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिचा फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. आता सोशल मीडियावर श्वेता तिवारीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. तसेच त्यामधून तिच्या लव्ह लाईफची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
2 / 6
श्वेता तिवारीने तिचा दुसरा घटस्फोट झाल्यानंतर स्वत:ला अत्यंत स्मार्ट पद्धतीने सांभाळत जीवनात आगेकूच केली आहे. दरम्यान, तिने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. हल्लीच श्वेता तिवारी ही मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाताना स्पॉट झाली.
3 / 6
श्वेता तिवारी सिद्धिविनायक मंदिरामध्ये तिच्या पुढील प्रोजेक्टच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी पोहोचली होती.
4 / 6
यावेळी श्वेता तिवारी ही तिचा सहकलाकार मानव गोहिल याच्यासह दिसली. सोशल मीडियावरील युझर्सना याची माहिती नव्हती.
5 / 6
श्वेता तिवारी हिचा नवा कार्यक्रम मै हूं अपराजिता लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या माध्यमातून ती टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. त्या निमित्त श्वेता तिवारी यशासाठी प्रार्थना करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात आली होती. तिने बाप्पांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. श्वेता आणि मानव यांनी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर फोटोसेशनही केले.
6 / 6
या मालिकेमध्ये श्वेता तिवारी ही तीन मुलींच्या आईची भूमिका निभावणार आहे. ती एकट्याने तिच्या मुलींचा सांभाळ करताना दिसेल. या मालिकेत श्वेता अपराजिता हिची भूमिका करणार आहे.
टॅग्स :श्वेता तिवारीसिद्धिविनायक गणपती मंदिरटेलिव्हिजन