PHOTO: 'शिवा' मालिकेतील 'सिताई' आहे 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी; तुम्हाला माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:52 IST
1 / 7झी मराठीवरील 'शिवा' मालिका ही प्रचंड लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा कौशिक यांची मुख्य भूमिका आहे. 2 / 7त्याचबरोबर शिवा मालिकेत सिताईची भुमिका अभिनेत्री मिरा वेलणकरने उत्तमरित्या वठवली आहे. 3 / 7आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. 4 / 7परंतु, तुम्हाला माहिती आहे का अभिनेत्री मीरा वेलणकर ही सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते प्रदिप वेलणकर यांची कन्या आहे. 5 / 7तसंच मीराची आई रजनी वेलणकर आणि बहीण मधुरा वेलणकर या देखील उत्तम अभिनेत्री आहेत. 6 / 7मीराने अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात मीराने काम केलं आहे. 7 / 7मीराने ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत चित्रलेखा ही भूमिका साकारली होती. तसंच 'बटरफ्लाय' या चित्रपटाचे दिग्दर्शन मीराने केलं आहे.