Join us

Smriti Irani : "1500 रुपयांसाठी केलेलं झाडू, लादी आणि भांडीचं काम"; स्मृती इराणी झाल्या भावूक, जुने दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 12:29 PM

1 / 12
जेव्हा अभिनेत्री स्मृती इराणी यांनी टीव्हीवर तुलसी विरानीच्या भूमिकेत दिसल्या तेव्हा सगळेच त्यांचे चाहते झाले. एकता कपूरचा 'क्योंकी सास भी कभी बहू थी' हा शो यशस्वी झाला आणि या शोने स्मृती इराणींना तुलसी ही पदवी दिली. या शोमध्ये स्मृती इराणी यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडली.
2 / 12
स्मृती इराणी यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मेहनत करून त्यांनी यश संपादन केले आहे. आता त्या केंद्रीय मंत्री आहेत. इराणी यांनी आता एका मुलाखतीत आपल्या संघर्षाचे दिवस आठवले आहेत.
3 / 12
केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी मुंबईतील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये क्लिनर म्हणूनही काम केले, ज्यासाठी त्यांना महिन्याला 1500 रुपये मिळायचे. निलेश मिश्राला दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी अनेक गोष्टींबद्दल उलघडा केला आहे.
4 / 12
जेव्हा स्मृती यांची मिस इंडियासाठी निवड झाली. मात्र सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची गरज होती. तेव्हा स्मृती इराणी यांनी वडिलांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र पैसे देण्याऐवजी वडिलांनी स्मृती इराणींसमोर एक अट घातली.
5 / 12
मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या की, वडिलांनी सांगितले होते- मी तुला पैसे देईन, पण अट अशी आहे की तुला मला व्याजासह पैसे परत करावे लागतील. जर तू पैसे परत करू शकली नाहीस तर मी माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करून देईन. वडिलांची ही अट स्मृतींनी मान्य केली होती.
6 / 12
स्मृती इराणी यांनी सांगितले की, सौंदर्य स्पर्धेतून मिळालेल्या भेटवस्तूंमधून 60,000 रुपये वडिलांना परत केले होते, परंतु उर्वरित पैसे परत करण्यासाठी तिला एक काम करावे लागले. त्यांनी काही जाहिराती केल्या, पण तरीही त्यांना मजबूत उत्पन्नाचा स्रोत हवा होता. यावेळी त्यांनी क्लीनर म्हणून काम केलं.
7 / 12
याविषयी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या- मी मॅकडोनाल्डमध्ये नोकरीसाठी गेले होते तेव्हा फक्त दोनच जागा शिल्लक होत्या. त्याने मला सांगितले फाऊंडेशन जॉब आहे, ज्यामध्ये झाडू, लादी आणि भांडी करावी लागतील. मग मी नोकरीला हो म्हणाले. त्यासाठी त्यांनी मला 1500 रुपये दिले.
8 / 12
जुन्या दिवसांची आठवण करून देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, त्या ठिकाणी आठवड्यातून सहा दिवस काम करायच्या. यानंतर सुट्टीत ऑडिशनसाठी जात असे. स्मृती इराणी यांना पहिला टेलिव्हिजन शो ऑडिशनद्वारे मिळाला, त्यानंतर एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमध्ये तुलसी बनल्या.
9 / 12
स्मृती इराणी यांचा अभिनेत्री होण्याचा प्रवास पाहता, एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम आणि झोकून देऊन काही करायचे असेल, तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेच म्हणावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :स्मृती इराणी