Join us

पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 12:59 PM

1 / 8
'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला स्टार प्रवाह मालिकांमधील कलाकार एकत्र आले होते. रुपाली भोसलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या साडीवर मोराची खास डिझाईन बघायला मिळाली.
2 / 8
काल २३ ऑगस्टला दुपारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात हा सोहळा पार पडला. यावेळी अपूर्वा नेमळेकरची खास केशरी साडी सर्वांच्या नजरेत भरली
3 / 8
सुख म्हणजे नक्की काय असतं मधील खलनायिका माधवी निमकरसुद्धा या सोहळ्याला पारंपरिक अंदाजात उपस्थित होती.
4 / 8
आई कुठे काय करते फेम अनिरुद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी या सोहळ्याला उपस्थित होते. निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर केशरी उपरणं अशा थाटात मिलिंग गवळी सहभागी झाले होते
5 / 8
घरोघरी मातीच्या चुली मधील ऐश्वर्या आणि सारंग. म्हणजेच अभिनेता उदय नेने आणि अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने साधासुधा तरीही आकर्षक पोशाख
6 / 8
आई कुठे काय करते मालिकेतील आरोही आणि यश. अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री कौमुदी वालोकर यांनी मॅचिंग असे निळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते.
7 / 8
घरोघरी मातीच्या चुलीमधील अभिनेता सुमीत पुसावळे. सुमीत मालिकेत हृषिकेशची भूमिका साकारत आहे
8 / 8
मुरांबा मालिकेतील सर्वांचं लाडकं गोड कपल म्हणजे रमा आणि अक्षय. अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकरने सर्वांचं लक्ष वेधलं
टॅग्स :गणेशोत्सवस्टार प्रवाहरुपाली भोसलेशशांक केतकरअपूर्वा नेमळेकर