Join us

Photos : सुलेखा तळवलकरच्या लेकीने दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे तिचा जोडीदार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 11:46 AM

1 / 9
बॉलिवूडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतही सध्या स्टारकिड्सची चर्चा असते. जसे की आदिनाथ कोठारे, अभिनय बेर्डे, शुभंकर तावडे या मुलांनी वडिलांप्रमाणेच अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. तर काही स्टारकिड्स असे आहेत ज्यांनी करिअरच्या वेगळ्या वाटा निवडल्या. त्यातलीच एक टिया तळवलकर(Tia Talwalkar).
2 / 9
मराठी अभिनेत्री स्मिता तळवलकर यांची नात आणि सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar)यांची मुलगी टिया तळवलकर सध्या चर्चेत आहे. टिया आईसारखीच अतिशय सुंदर आणि देखणी आहे.
3 / 9
एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असं टियाचं सौंदर्य आहे. तिला आर्य हा भाऊही आहे. मात्र दोघांनी आई आणि आज्जीसारखं अभिनयात न येता वेगळं करिअर निवडलं.
4 / 9
टियाने 2021 साली 'मिस दादर' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. यानंतर ती सर्वांच्या नजरेत आली. आई आणि आजीच्या पावलावर पाऊल ठेवत टियाही सिनेसृष्टीत येईल असं अनेकांना वाटलं मात्र तसं झालं नाही. स्मिता तळवलकर यांनी तिला एका चित्रपटात बालकलाकार म्हणून घेतलं होतं. पुढे मात्र ती कुठेच दिसली नाही.
5 / 9
टिया खूपच क्रिएटिव्ह आहे. ती उत्तम आर्टिस्ट आहे. तिला कुकिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवण्याची आवड आहे. तिने स्वत:साठी वेगळंच क्षेत्र निवडलं आहे. त्यामुळे टिया कायम प्रकाशझोतापासून दूरच राहिली. टिया हे तिचं नाव कसं पडलं याचाही इंटरेस्टिंग किस्सा आहे.
6 / 9
कागदोपत्री टिया हे नाव असलं तरी तिला घरी वेगळ्या नावाने हाक मारतात. टिया या नावाला आजी स्मिता तळवलकर यांचा विरोध होता. त्यांना टिया हे नाव परदेशी वाटायचं. स्मिता यांना तिचं दुर्गा असं मराठी नाव ठेवायचं होतं. नातीच्या बारशाला दुर्गा हेच नाव ठेवलं गेलं.
7 / 9
पण जन्मदाखल्यावर सखाराम मामाने चुकून टिया याच नावाची नोंद केली. हे समजल्यावर स्मिता तळवलकर यांना राग आला होता. असं झालं तरी घरी टियाला आजही दुर्गा नावानेच हाक मारली जाते.
8 / 9
टिया तळवलकर अचानक चर्चेत येण्याचं वेगळंच कारण आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. नमित काळे या मुलासोबत ती अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. नमितच्या वाढदिवशीच तिने एक व्हिडिओ पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे.
9 / 9
मराठी स्टारकिड्समध्ये आता टियाचीही चर्चा होऊ लागली आहे. आई सुलेखा तळवलकर दोन्ही मुलांसोबत अनेकदा फोटो शेअर करत असते. टिया किंवा आर्य यांच्यापैकी कोणी अभिनयात येतं का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. मात्र सध्या तरी दोघांचा अभिनय करण्याचा विचार नाही.
टॅग्स :मराठी अभिनेतादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टटेलिव्हिजन