Join us  

सूरजने जिंकलेली ट्रॉफी पॅडीच्या हातात दिली! अभिनेता म्हणाला- "महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप आज.."

By देवेंद्र जाधव | Published: October 07, 2024 9:50 AM

1 / 7
काल संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली. कारण सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता झाला
2 / 7
सूरज विजयी होताच सर्वांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. याशिवाय रितेश देशमुखने त्याच्यासोबत खास सेल्फी काढला
3 / 7
अभिजीत सावंतला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले. सूरज आणि अभिजीतसोबत रितेशने झक्कास सेल्फी घेतला
4 / 7
सूरज चव्हाण जिंकताच व्हॅनिटी वॅनमध्ये जाऊन पॅडी कांबळेने त्याची खास भेट घेतली. यावेळी सूरजने ट्रॉफी पॅडीच्या हातात दिली
5 / 7
पॅडीने सूरजची ट्रॉफी हातात घेऊन त्याच्यासोबत खास फोटो काढला. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता
6 / 7
सूरज चव्हाणने जिंकलेली ट्रॉफी उचलताच पॅडीच्या आनंदाला उधाण आले होते. बिग बॉसच्या घरात अनेक छोट्या छोट्या गोष्टी पॅडीने सूरजला समजावल्या होत्या.
7 / 7
'या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!', अशी खास प्रतिक्रिया पॅडीने दिली आणि सूरजची गळाभेट घेतली
टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनरितेश देशमुख