Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:09 PM1 / 9लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना हिच्या लग्नाला ७ महिने झाले आहेत. २ मार्च २०२४ रोजी अभिनेत्रीने बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न केलं.2 / 9अभिनेत्रीचं वैवाहिक जीवन काही खास नव्हतं. 'कपल ऑफ थिंग्स' पॉडकास्टमध्ये सुरभीने सांगितलं की, आता ती तिच्या वैवाहिक आयुष्यात नॉर्मल झाली आहे.3 / 9सुरभी म्हणाली, 'जेव्हा माझं करणशी लग्न झालं. तेव्हा मी २ महिने रोज रात्री रडायचे. मी किती रात्री रडत घालवल्या आहेत हे माहीत नाही.'4 / 9'आम्ही १३ वर्षे डेट केलं आणि नंतर लग्न केलं. आम्ही खूप चढ-उतार पाहिले, पण जेव्हा आम्ही लग्नानंतर एकत्र राहू लागलो तेव्हा आम्हाला कळलं की डेटिंग आणि वैवाहिक जीवन खूप वेगळं आहे.'5 / 9'मला काहीच मॅनेज करता येत नव्हतं. मी माझ्या आई-वडिलांच्या घरी असताना आई-वडील सगळं सांभाळत असत. मला फारसं मॅनेज करावं लागलं नव्हतं. पण लग्नानंतर मला एकटीला हे सर्व कसं सांभाळायचं ते कळत नव्हतं.'6 / 9'मी रोज रात्री रडायचे कारण मला माझ्या आई-वडिलांशिवाय जगण्याची सवय नव्हती. त्यामुळे मला माझ्या आई-वडिलांची खूप आठवण येते. करणने नेहमीच माझी काळजी घेतली आहे.'7 / 9'तो मला शांत करायचा आणि मला माझ्या आई-वडिलांना भेटायला घेऊन जायचा. आता सगळं नॉर्मल झालं आहे. आता मी सगळं मॅनेज करते. पण सुरुवातीला मला वाटायचं की, मी लग्न का केलं?'8 / 9अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सुरभीचे असंख्य चाहते आहेत. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications