Join us

'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेच्या रणरागिनी लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 5:57 PM

1 / 8
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील राणू अक्काच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने रणरागिनी लूकमध्ये फोटोशूट केले आहे. 
2 / 8
अश्विनीचा या लूकसाठी मेकअप सज्जना दुताल आणि वेशभूषा तनूजा डिझायनर यांनी काम केले आहे. तर ऋषीकेश देशमुख यांनी हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अश्विनीच्या या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
3 / 8
झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
4 / 8
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी फोटो व व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
5 / 8
ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
6 / 8
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या आधी अश्विनी हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
7 / 8
या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली.
8 / 8
अभिनयाशिवाय सामाजिक भान जपत अश्विनीने 'स्वराज्य परिपूर्ण किचन' हे हॉटेल नुकतेच मिरा रोड येथे सुरु केले आहे.
टॅग्स :अश्विनी महांगडेस्वराज्य रक्षक संभाजी