Join us

'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ६ महिन्यात केलं १७ किलो वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 1:06 PM

1 / 9
अभिनेत्री म्हटलं की त्यांना मेंटेन राहणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवावं लागतं. अनेकदा अभिनेत्रींचं ट्रान्फॉर्मेशन पाहून आश्चर्य वाटतं.
2 / 9
'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीचंही असंच ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे थक्क झालेत. ६ महिन्यात तिने १७ किलो वजन कमी केलं आहे. ७५ किलो वरुन ती ५८ किलोवर आली.
3 / 9
ही अभिनेत्री आहे दीप्ती साधवानी (Deepti Sadhwani). दीप्तीने आपल्या या ट्रॉन्सफॉर्मेनशचा प्रवास सर्वांसोबत शेअर केला आहे. काही महिन्यात एवढं वजन कमी करणं किती कठीण होतं हे तिने सांगितलं.
4 / 9
दीप्तीने वजन कमी करण्याविषयी सांगितलं की, 'हे अजिबातच सोपं नव्हतं. अनेकदा असं वाटलं की मला जमणार नाही. पण मग मी स्वत:लाच समजावलं की प्रत्येक छोटं पाऊल गरजेचं आहे.'
5 / 9
हा बदल हळूहळू घडत होता पण त्यात सातत्य होतं. यातच खरी जादू आहे. मी साखर, प्रोसेस्ड फूड खाणं बंद केलं. यासोबत ग्लूटेन फ्री डाएट घेत होते. १६ तास कडक इंटरमिटेंट फास्टिंग केलं.
6 / 9
यासोबत सतत कॅलरी मोजत राहिले. ते नियंत्रणात ठेवलं. बॅलन्स डाएटबरोबर मी कधीकधी चीट डेही ठेवला होता. मी योगा, बॉक्सिंग, आणि स्वीमिंगही करायचे.
7 / 9
मला हा बदल केवळ शारिरीकरित्या करायचा नव्हता. तर मानसिक आरोग्य आणि ऊर्जा यांचीही काळजी घ्यायची होती.
8 / 9
दीप्ती यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्येही सहभागी झाली होती. तिच्या कान्स रेड कार्पेट लूकनेही सर्वांना घायाळ केलं होतं
9 / 9
दीप्ती सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. आपल्या ग्लॅमरस लूक्समुळे ती अनेकांना भुरळ घालते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत दरवर्षी 'गोकुळधाम प्रीमिअर लीग' ही स्पर्धा असते. याच स्पर्धेंच्या अँकरच्या भूमिकेत दीप्तीने काम केलं होतं.
टॅग्स :टिव्ही कलाकारवेट लॉस टिप्सटेलिव्हिजनसोशल मीडिया