Join us

'तारक मेहता'साठी भिडे मास्तरांच्या लेकीला मिळत होतं 2.4 लाखांचं पॅकेज; आता अभिनय सोडून काय करतीये निधी भानुशाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 4:04 PM

1 / 9
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. गेल्या १६ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.
2 / 9
या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यातलीच एक बालकलाकार म्हणजे निधी भानुशाली.
3 / 9
या मालिकेत निधीने भिडे मास्तरांच्या लेकीची सोनू भिडेची भूमिका साकारली होती.
4 / 9
निधीने ही मालिका सोडल्यानंतर त्यात अनेक बालकलाकारांनी सोनूची भूमिका साकारली. मात्र, सोनूची क्रेझ आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते.
5 / 9
२०१२ पासून सोनू तारक मेहतामध्ये काम करत होती. मात्र, २०१७ मध्ये तिने शिक्षण पूर्ण करण्यासाठी ब्रेक घेतला.
6 / 9
ही मालिका सोडल्यानंतर निधी कोणत्याही दुसऱ्या मालिकेत किंवा कार्यक्रमात झळकली नाही. त्यामुळे ती सध्या काय करते हा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.
7 / 9
निधी तारक मेहतासाठी तब्बल २.४ लाख रुपये मानधन स्वीकारत होती. म्हणजे दररोज तिला ८ हजार रुपये फी मिळत होती.
8 / 9
निधी सध्या कलाविश्वापासून दूर आहे. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर असून तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे.
9 / 9
निधी तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चांगली कमाई करते.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार