Join us  

'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 4:56 PM

1 / 8
Sonu Bhide Palak Sindhwani Bold Look Taarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय सिरीयलमधील भिडे मास्तरांची 'सोनू' हे पात्र आजपर्यंत विविध अभिनेत्रींनी साकारले.
2 / 8
निधी भानुशाली हिने सोनूची भूमिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसचा तडका चाहत्यांना दाखवून दिला.
3 / 8
पण सध्याची सोनू म्हणजेच पलक सिंधवानी ही बोल्डनेस आणि हॉटनेसच्या बाबतीत जुन्या सोनूला चांगलीच टक्कर देताना दिसते.
4 / 8
पलक सिंधवानी ही सध्या तारक मेहता मध्ये जरी सोज्वळ भूमिका साकारत असली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे.
5 / 8
सोशल मीडियावर ती सातत्याने विविध फोटोशूटच्या पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा हा लूक चांगलाच पसंतीस उतरताना दिसतोय.
6 / 8
नुकताच पलकने आणखी एक ताजा फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर आपली फिगर फ्लाँट करताना दिसतेय.
7 / 8
तिने आपल्या फोटोशूटसोबत एक छानसं कॅप्शनही लिहिलं आहे. सूर्यास्ताच्या या मनमोहक क्षणी तुम्ही आणि मी, असे ते कॅप्शन आहे.
8 / 8
समुद्राच्या पाण्यात उभी राहून तिने हे फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोंना भरपूर लाईक्स मिळाले असून कमेंट्सही मिळत आहेत.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माव्हायरल फोटोज्इन्स्टाग्रामसोशल मीडियासोशल व्हायरल