साध्याभोळ्या 'जेठालाल'चं शिक्षण किती? एका एपिसोडसाठी दिलीप जोशी घेतात 'इतके' लाख! संपत्तीचा आकडा एकदा पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 7:08 PM1 / 9'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील जेठालाल प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला आहे. या जेठालालच्या भूमिकेने अभिनेता दिलीप जोशींनाही प्रसिद्धी मिळवून दिली. आज दिलीप जोशींचा ५६वा वाढदिवस आहे. 2 / 9दिलीप जोशी यांनी BCA पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. कॉलेज जीवनात असताना त्यांना इंडियन नॅशनल थिएटरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 3 / 9त्यांनी सलमान खानच्या 'मैंने प्यार किया सिनेमातून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. या सिनेमात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. 4 / 9पण, अभिनयातील करिअरमध्ये यश मिळत नसल्याने त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीही सुरू केली होती. १९८५ ते १९९० या काळात ते ट्रॅव्हल एजन्सीसाठी काम करत होते. 5 / 9त्यानंतर २००८ साली 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून त्यांनी पुन्हा अभिनयात कमबॅक केलं. 6 / 9अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या दिलीप जोशींना तारक मेहताने लोकप्रियता मिळवून दिली. गेल्या १६ वर्षांपासून ते या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 7 / 9तारक मेहता मालिकेत जेठालालची भूमिका साकारण्यासाठी दिलीप जोशी लाखोंमध्ये मानधन घेतात. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्यांना १.५ लाख रुपये मानधन मिळतं. 8 / 9दिलीप जोशी एकूण ४७ कोटींचे मालक आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये तब्बल १३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 9 / 9पाच वर्षांपूर्वी त्यांच्या नावावर २० कोटींची प्रॉपर्टी होती. तर मीडिया रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये त्यांच्या प्रॉपर्टीत ४७ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications