Join us

Tejasswi Prakash : "मी रस्त्यावर एकटी होती आणि 2 मुलं..."; तेजस्वी प्रकाशने सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 12:52 PM

1 / 10
तेजस्वी प्रकाश ही टीव्हीची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयापासून ते सौंदर्यासाठी तेजस्वी खूप चर्चेत असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावरही बोलबाला पाहायला मिळत आहे. तिचे चाहते तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आणि तिचे फोटो पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात.
2 / 10
सध्या तेजस्वी सर्वात लोकप्रिय शो 'नागिन 6' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. याच दरम्यान आता अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार शेअर केला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, तेजस्वी प्रकाशने सांगितले की, ती टीनएजमध्ये असताना तिचा विनयभंग झाला होता.
3 / 10
तेजस्वी म्हणाली, 'दहावीनंतर, मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडने जॉगिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिचं घर हे माझ्या घराच्या आधी यायचं. त्यामुळे एके दिवशी ती जॉगिंग केल्यानंतर आधी घरी पोहोचली आणि मी रस्त्याने आपल्या घरी जात होती.'
4 / 10
'अचानक तिथे दोन मुलं आली. त्यांनी मला पाहिलं आणि तिथे आली. सकाळचे सहा वाजले होते त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. ती मुलं बाईकवर होती. त्यांनी मला पाहिलं आणि ती एकमेकांशी काही बोलू लागली. मी रस्त्यावर एकटी होते.
5 / 10
'मुलं माझ्याजवळून गेली आणि पुन्हा पुन्हा बाईकवरून माझ्या आजुबाजूला फेऱ्या मारू लागली. एवढ्यात मी पटकन एका बिल्डींगकडे पळत गेले, गार्डने मला अडवलं पण मी त्याला विनंती केली की मला जायचे आहे.'
6 / 10
'मी बिल्डिंगच्या बागेत पळत गेले कारण तिथे बरीच झाडे होती त्यामुळे मी त्या झाडांमध्ये लपून बसले. जवळपास अर्धा तास बसून राहिली आणि मग घरी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर आले' असं तेजस्वीने सांगितलं.'
7 / 10
'मुलं मला दुरून पाहत आहेत असं मला वाटलं. मी विचार केला की मी माझ्या घरी गेले तर या मुलांना माझ्या लोकेशनबद्दल कळेल आणि माझा लहान भाऊ आणि आई घरी आहेत. म्हणून मी मुद्दाम माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली कारण ती तिच्या भावांसोबत आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासह राहत होती.'
8 / 10
'मला वाटले की जर ही मुले माझ्या मागे या घरात आली तर माझ्या मैत्रिणीचचे भाऊ त्यांना पाहून घेतील. एक आठवड्यानंतर, मी पुन्हा घराच्या बाहेर पडली आणि बॅडलक असं होतं की मी तेच कपडे परिधान केले होते.'
9 / 10
'मी टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. संध्याकाळची वेळ होती आणि ही मुलं त्यांच्या बाईकवर सतत फिरत होती' असं अभिनेत्रीने सांगितलं. तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
10 / 10
मुलींना त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या संघर्षातून सामोरे जावे लागते हे मुलांनी जाणून घेतले पाहिजे जेणेकरून त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होईल असंही तिने म्हटलं आहे. तेजस्वी प्रकाश सध्या 'नागिन 6' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :तेजस्वी प्रकाशटेलिव्हिजन