Join us  

PHOTO: थाटात पार पडलं 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं डोहाळजेवण; सहकलाकारही दिसले सोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:25 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रद्धा आर्या. लवकरच अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
2 / 8
झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' या मालिकेत तिने प्रीता नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या अभिनेत्री श्रद्धा आर्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे.
3 / 8
श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अलिकडेच श्रद्धाने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली होती.
4 / 8
अभिनेत्री श्रद्धा आर्या लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या ३ वर्षानंतर तिच्या घरी पाळणा हलणार आहे.
5 / 8
नुकतेचं अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या डोहाळजेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 8
या फोटोंमध्ये श्रद्धा तिच्या पतीसोबत केक कापताना दिसते आहे.
7 / 8
श्रद्धाने फोटोंमध्ये गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत कुटुंबियांसह 'कुंडली भाग्य' मालिकेतील सहकलाकारही दिसत आहेत.
8 / 8
अभिनेत्री १६ नोव्हेंबर २०२१ मध्ये राहुल नागल यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली. आता लग्नाच्या ३ वर्षानंतर ते दोघे आई-बाबा होणार आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्