Join us  

एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 5:22 PM

1 / 10
टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये निया शर्माच्या नावाचा समावेश होतो. ही अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच क्लासी लूकनेही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. उद्या नियाचा वाढदिवस आहे.
2 / 10
निया शर्मा आपल्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह आहे. अभिनेत्री दररोज आपल्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते.
3 / 10
१४ वर्षांपासून निया टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. ती नेहमीच तिचा आनंद हा चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 10
अभिनेत्रीने २०१० मध्ये 'काली - एक अग्निपरीक्षा' मधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्याला खरी लोकप्रियता ‘एक हजारों में मेरी बहना है’ मधून मिळाली.
5 / 10
अभिनेत्रीने या शोनंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आताही अनेक हिट शोमध्ये काम करत आहे.
6 / 10
लोकप्रिय अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निया शर्मा जवळपास ५९ कोटी रुपयांची मालकीण आहे.
7 / 10
निया टीव्ही शोमधून दरमहा ३० लाख रुपये कमावते. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंट, म्युझिक व्हिडिओ, टीव्ही जाहिरातींमधून लाखोंची कमाई करते.
8 / 10
कार कलेक्शनबद्दल बोलायचे झालं तर नियाकडे ऑडी Q7, व्होल्वो XC90, ऑडी A4 सारख्या अनेक महागड्या कार आहेत.
9 / 10
निया शर्मा सध्या 'लाफ्टर शो'मध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर फिदा होतात.
10 / 10
टॅग्स :निया शर्माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार