Join us

'ठरलं तर मग'मधील साधी भोळी कुसुमताई, खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून विश्वासच बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:44 IST

1 / 7
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनबरोबरच इतर पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करतात.
2 / 7
मालिकेत सायलीची मैत्रीण आणि तिला मदत करणारी कुसुमताई तिच्या साध्या भोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेते.
3 / 7
पण, मालिकेत अगदी साधी दिसणारी कुसुमताई खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे.
4 / 7
स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने कुसुमताईचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
5 / 7
अभिनेत्रीने या सोहळ्यासाठी खास लूक केला होता. तिने लाँग गाऊन परिधान केला होता.
6 / 7
केस मोकळे सोडत आणि अगदी हलका मेकअप केला होता. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
7 / 7
अभिनेत्री दिशा दणाडे मालिकेत कुसुमताईचं पात्र साकारत आहे. दिशा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह