'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीची परदेस वारी, मॉर्डन लूकमध्ये दिसली अर्जुनची आई By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 5:23 PM1 / 7'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता दिघे अर्जुनच्या आईची म्हणजे कल्पना ही भूमिका साकारत आहेत. 2 / 7प्राजक्ता सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्या पतीसह परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. 3 / 7प्राजक्ता व्हिएतनामला गेल्या आहेत. परदेशवारीचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 7या फोटोंमध्ये त्यांचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिएतनामच्या रस्त्यांवर उभं राहून त्यांनी फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. 5 / 7पडद्यावर साडीमध्ये दिसणाऱ्या प्राजक्ता यांचा मॉडर्न लूक फोटोत पाहायला मिळत आहे. 6 / 7जीन्स, टॉप, शूज आणि डोळ्यांवर गॉगल असा लूक त्यांनी केला आहे. त्यांचा हा मॉडर्न अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 7 / 7प्राजक्ता या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications