पैठणी आणि साऊथ स्वॅग! बहिणीच्या लग्नात 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीच हवा By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 5:22 PM1 / 8'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने माया हे पात्र साकारलं होतं. 2 / 8या मालिकेने रुचिराला लोकप्रियता मिळवून दिली. रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते. 3 / 8नुकतंच रुचिराने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 4 / 8रुचिराच्या बहिणीचं लग्न नुकतंच पार पडलं. बहिणीच्या लग्नात करवली बनवलेल्या रुचिराचा हटके अंदाज पाहायला मिळाला. 5 / 8रुचिराने पांढऱ्या रंगाची पैठणी नेसून साऊथ इंडियन लूक केला होता. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. 6 / 8पैठणी नेसून तिने पारंपरिक ज्वेलरी घातल्याचं दिसत आहे. 'मराठमोळी पैठणी आणि साऊथ स्वॅग' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. 7 / 8रुचिराने फोटोसाठी गॉगल लावून हटके पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. 8 / 8सध्या रुचिरा स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम करत आहे. तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभाग घेतला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications