जांभळ्या जरतारी साडीत जुईचं फोटोशूट, सासूबाई कमेंट करत म्हणाल्या... By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 1:17 PM1 / 8मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या नायिकांच्या यादीत जुई गडकरी हे नाव अग्रस्थानी येतं. 2 / 8स्टार प्रवाहवरील 'पुढलं पाऊल' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने नावारुपाला आली. 3 / 8 सध्या 'ठरलं तर मग' मालिकेमुळे अभिनेत्री चर्चेत आहे. त्यात तिने साकारलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांना भावल्याचं दिसतंय. 4 / 8जुई अनेकदा तिचे फोटो इंटरनेटवर शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. 5 / 8सोशल मीडियावर अभिनेत्री सातत्याने चर्चेत येत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 6 / 8अलिकडेच तिने जांभळ्या रंगाची साडी नेसून नवं फोटोशूट केलं आहे. तिचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.7 / 8फोटोंमध्ये जुईने जांभळ्या रंगाची हॅंडलूम प्रिंटेड साडी नेसली आहे. तसेच पदरावर प्रिंट केलेले राधा-कृष्ण प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहेत.8 / 8त्याचबरोबर हातात वीणा घेत तसेच झोपाळ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देत तिने फोटो क्लिक केलेत. आणखी वाचा Subscribe to Notifications