साध्वी बनून दारोदारी फिरतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री, पतीपासून झाली वेगळी अन् मागतेय भिक्षा By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 11:49 AM1 / 10आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने २७ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत काम केले. तिने केलेल्या भूमिका आणि मालिकेतून ती कमी कालावधीत लोकप्रिय झाली. पण अचानक तिच्या आयुष्याला असं वळण लागलं की ती सर्व काही सोडून धर्माच्या मार्गावर निघाली. 2 / 10ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून नुपूर अलंकार आहे. नुपर अलंकारने २७ वर्षे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केले. या काळात तिने १५७ टीव्ही शोमध्ये काम केले आणि आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांना प्रभावित केले. तिच्या अशा काही व्यक्तिरेखा आहेत ज्या आजही लोकांच्या लक्षात आहेत. 3 / 10नुपूर जयपूरची रहिवासी आहे. तिचा जन्म १९७२ मध्ये झाला. रिपोर्ट्सनुसार, तिने जयपूरमधून शालेय शिक्षण घेतले आहे. यानंतर ती कुटुंबासह मुंबईला शिफ्ट झाली.4 / 10सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त नुपूर नृत्य आणि अभिनयातही निष्णात होती. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर नुपूरने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला.5 / 10 नुपूरच्या प्रसिद्ध मालिकांमध्ये 'शक्तीमान', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'दिया और बाती', 'राजाजी', 'सावरिया', 'ये प्यार ना होगा काम', 'स्वरागिनी', 'जोदे रिश्तों का सूर', 'अनेक' यांचा समावेश आहे. 'ना बोले तुम ना बोले' सारख्या शोचा समावेश आहे.6 / 10टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा बनल्यानंतर नुपूरने २०२२ मध्ये असा धक्कादायक निर्णय घेतला ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नुपूरने अचानक इंडस्ट्री सोडून धर्माचा मार्ग स्वीकारला. 7 / 10नुपूरच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नुपूरने सांगितले होते की, तिचे गुरु शंभू शरण झा आहेत आणि ती स्वत:ला भाग्यवान समजते. ज्यांनी तिला अध्यात्म समजण्यास मदत केली.8 / 10नुपूर ब्रजमधील लोकांच्या घरी भीक मागताना दिसली आहे. हे फोटो सोशल मीडियावर येताच तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. तिने साध्वीचे कपडे घातले होते आणि कपाळावर चंदन लावले होते.9 / 10नुपूर ब्रजमधील लोकांच्या घरी भीक मागताना दिसली आहे. हे फोटो सोशल मीडियावर येताच तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. तिने साध्वीचे कपडे घातले होते आणि कपाळावर चंदन लावले होते.10 / 10सध्या नुपूर सोशल मीडियावर संन्यासी लूकचे फोटो शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications