Join us  

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील गायत्री प्रभूचा लूक 'या' अभिनेत्रीने केलाय डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 4:18 PM

1 / 7
स्टार प्रवाहवर प्रसारीत होत असणारी थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची मालिका.
2 / 7
थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील गायत्री प्रभूच्या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. गायत्रीची भूमिका साकारलीय मानसी कुलकर्णी या अभिनेत्रीने
3 / 7
गायत्री प्रभू अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे. कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये गायत्री मॅनेजरचं काम सांभाळतेय
4 / 7
गायत्री वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
5 / 7
गायत्री प्रभूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करतेय.
6 / 7
अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभुषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येने गायत्रीचा लूक डिझाईन केला आहे.
7 / 7
गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला मिळणाऱ्या भरभरुन प्रतिसादामुळे मानसी कुलकर्णी आनंदात आहे
टॅग्स :स्टार प्रवाहमराठीमराठी अभिनेता