Join us

तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न, नवऱ्यापासून झाली विभक्त, आता असं जगतेय 'द्रौपदी' तिचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 1:58 PM

1 / 8
महाभारतातील द्रौपदीची भूमिका करून घराघरात नावारूपास आलेल्या रूपा गांगुलीला आजही कोणी विसरले नाही. आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
2 / 8
महाभारत हा टीव्ही शो १९९८ मध्ये सुरू झाला. हा शो चाहत्यांना खूप आवडला होता. महाभारतात द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रूपा गांगुलीला या पात्रासाठी खूप प्रेम मिळाले, पण तिचं वैयक्तिक आयुष्य तितकं चांगलं नव्हतं.
3 / 8
रूपा गांगुलीने १९९२ मध्ये ध्रुबो मुखर्जीसोबत लग्न केले, लग्नानंतर रुपानेही करिअर सोडले. रुपाच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.
4 / 8
एका मुलाखतीत रूपा गांगुलीने खुलासा केला होता की, लग्नापूर्वी मी अशा प्रोफेशनमध्ये होते जिथे मी ग्लॅमरस दिसत होते, इंडस्ट्रीमध्ये भूमिकेसाठी तुला असे दिसावे लागेल, पण ही माझी चूक होती का?, मला असे वाटते.
5 / 8
पुरुषांना त्यांच्या पत्नीला सेलिब्रिटी म्हणून स्वीकारणे कठीण आहे. लग्नानंतर रूपा गांगुलीने स्वतःला खूप बदलण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले होते की, 'लग्नानंतर मी रात्री उशिरा कॉल उचलणे बंद केले, माझे शूट संपताच मी थेट घरी यायचे, मी माझे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले'.
6 / 8
आपल्या पतीच्या कृत्यामुळे त्रासलेल्या रूपा गांगुलीने एकेकाळी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतः कबूल केले की तिने तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती म्हणाली की मी आत्महत्येचा अनेकदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी देवाने मला वाचवले.
7 / 8
रूपाच्या सर्व प्रयत्नांनंतरही, जेव्हा तिचे तिच्या पतीसोबतचे संबंध चांगले राहिले नाहीत, तेव्हा अभिनेत्रीने २००६ मध्ये तिचा पती धुब्रो याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
8 / 8