श्रेयसच्या रिअल लाइफ अश्विनीला पाहिलंत का? आहे खूपच साधीसुधी By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 1:31 PM1 / 7छोट्या पडद्यावर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली मालिका म्हणजे 'तू चाल पुढं'. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दिपा परब-चौधरी बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांसमोर आली.2 / 7या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो.3 / 7या मालिकेतील अश्विनी आणि श्रेयस यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या रिअल लाइफविषयी जाणून घेण्याचा चाहते प्रयत्न करत असतात.4 / 7यामध्येच मालिकेतील श्रेयस म्हणजेच अभिनेता आदित्य वैद्य याच्या पत्नीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.5 / 7आदित्य सोशल मीडियावर सक्रीय असून तो कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतो.6 / 7यात अलिकडेच आदित्यने त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तेव्हापासून त्याच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.7 / 7आदित्यच्या पत्नीचं नाव प्राची गुप्ते-वैद्य असं आहे. प्राची कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. आणखी वाचा Subscribe to Notifications