यळकोट यळकोट जय मल्हार! मराठी अभिनेत्री पतीसोबत जेजूरीतील खंडोबा मंदिरात नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:42 IST
1 / 7धनश्री काडगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. धनश्री अलीकडेच पतीसोबत जेजूरीला गेली होती2 / 7धनश्री काडगावकरने जेजूरीला जाऊन मनोभावे दर्शन घेतलं. शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून धनश्रीने जेजूरीची ही भक्तिपूर्ण भटकंती केली3 / 7भंडारा उधळत आणि खंडोबासमोर नतमस्तक होत धनश्रीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केलेत.4 / 7धनश्री काडगावकरने मंदिराच्या बाहेर येऊन कळसाला नमस्कार केला. धनश्रीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय5 / 7धनश्री काडगावकरने तुझ्यात जीव रंगला मालिकेत साकारलेली वहिनीसाहेबांची भूमिका चांगलीच गाजली. धनश्रीने अलीकडेच तू चाल पुढं मालिकेत अभिनय केला6 / 7धनश्री काडगावकर आणि तिचा पती दुर्वेश देशमुख सोशल मीडियावर चर्चेत असतात. दोघांच्या जेजूरीच्या या खास फोटोंनाही चाहत्यांनी प्रेम दिलंय7 / 7धनश्री काडगावकरने जेजूरीचं दर्शन घेतल्यावर खास मिसळ पावचा आस्वाद घेतला. त्याचाही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला