Join us  

अधिपतीच्या खऱ्या मास्तरीण बाई! अभिनेत्याची रिअल लाईफ पत्नीदेखील आहे अभिनेत्री, तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:09 PM

1 / 8
'तुला शिकवीण चांगलाच धडा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अधिपती आणि अक्षराची जोडी प्रेक्षकांना आवडते.
2 / 8
झी मराठीच्या या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार मुख्य भूमिकेत आहेत. मास्तरीण बाईंच्या प्रेमात पडलेला अधिपती आणि त्यांची लव्हस्टोरी या मालिकेतून दाखविण्यात येत आहे.
3 / 8
'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेतील अधिपतींच्या मास्तरीणबाई तर सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. पण, हृषिकेशत्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंबद्दल तुम्हाला माहितीये का?
4 / 8
हृषिकेशच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे. नुकतंच त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली होती.
5 / 8
हृषिकेशची पत्नी स्नेहासुद्धा एक अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटकांमधे काम केले आहे . अभिनेत्री काजल काटेची ती बहीण आहे.
6 / 8
'एक महानायक- डॉ. आंबेडकर' या मालिकेत तिने जिजाबाई ही भूमिका साकारली होती. तर 'स्वराज्यजनिनी जिजामाता' मालिकेतही ती दिसली होती.
7 / 8
‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेतून हृषिकेशने आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘स्वराज्यजननी जिजामाता’, 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत तो दिसला.
8 / 8
‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकांतही त्याने काम केले आहे. सध्या तो अधिपती बनून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हृषिकेश आणि स्नेहाला एक मुलगी देखील आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेताझी मराठी