Join us  

थायलंडमध्ये बोल्ड झाल्या मास्तरीण बाई, शिवानी रांगोळेचा कधीही न पाहिलेला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:48 AM

1 / 7
'तुला शिकवीण चांगलाच धडा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील अक्षरा आणि अधिपती ही जोडी प्रेक्षकांना आवडते.
2 / 7
सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. मास्तरीण बाईंसोबत अधिपती थायलंडला हनिमूनला फिरायला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 7
थायलंडमध्ये मास्तरीण बाई आणि अधिपती एकमेकांबरोबर वेळ घालवत आहे. ते रोमँटिक झालेलेही पाहायला मिळत आहे.
4 / 7
'तुला शिकवीण चांगला धडा' मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे मास्तरीण बाईंची भूमिका साकारत आहे. शिवानीने शूटिंगदरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5 / 7
यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
6 / 7
या ड्रेसमध्ये शिवानीचा कधीही न पाहिलेला हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
7 / 7
शिवानीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
टॅग्स :शिवानी रांगोळेटिव्ही कलाकारझी मराठी