'तुमची मुलगी काय करते'फेम सावनीची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'उंच माझा झोका'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 1:03 PM1 / 9अलिकडेच छोट्या पडद्यावर 'तुमची मुलगी काय करते' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.2 / 9या मालिकेत मधुरा वेलणकर, विद्या करंजीकर, गौरी कुलकर्णी, सतीश पुळेकर, हरीश दुधाडे असे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत.3 / 9या कलाकारांसोबतच अभिनेत्री जुई भागवत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. तिने मधुराच्या लेकीची सावनी मीरजकर ही भूमिका साकारली आहे.4 / 9सध्या सोशल मीडियावर चर्चेत येणाऱ्या जुईची आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.5 / 9जुईच्या आईचं नाव दिप्ती बर्वे-भागवत असं असून ती अभिनेत्री असण्यासोबतच गायिका, सूत्रसंचालिकादेखील आहे.6 / 9'यात्रा', 'मोगरा फुलला', 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', 'मेरे साई', 'स्वामिनी', 'पिंजरा', 'उंच माझा झोका' अशा अनेक चित्रपट, मालिकांमध्ये दिप्ती झळकली आहे. 7 / 9 जुईदेखील तिच्या आईप्रमाणे अभिनेत्री असण्यासोबत नृत्यांगना आणि गायिका आहे.8 / 9जुई माझिया प्रियाला प्रीत कळेना या लोकप्रिय मालिकेत बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. 9 / 9तसंच तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातही भाग घेतला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications