Join us

Tunisha Sharma Case : ब्रेकअपनंतर शिजान तुनिषाला...., पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:22 AM

1 / 10
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासा होत आहे. या प्रकरणी शिजान खानच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत.
2 / 10
महाराष्ट्र पोलिसांनी दावा केला आहे की अभिनेता शिजान खान, त्याची सह-अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी कथित आरोपी असून, पोलीस कोठडीत असताना त्याने त्याच्या कथित दुसऱ्या मैत्रिणीसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट केल्या आहेत.
3 / 10
पोलिसांनी शिजानच्या ५ दिवसांच्या रिमांडसाठी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की शिजान खानचे तुनिषा शर्मा व्यतिरिक्त एका मुलीशी प्रेमसंबंध होते आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याने मोबाइलमधील चॅट डिलिट केले.
4 / 10
पोलिसांनी सांगितले की, जप्त केलेल्या काही चॅट्सनुसार, आरोपी इतर अनेक मुलींशीही बोलत असे. आरोपीच्या मोबाईलवर तपासादरम्यान अनेक महत्त्वाच्या चॅट्स आढळून आल्या आहेत, ज्यामध्ये ब्रेकअपनंतर आरोपीने तुनिषापासून अंतर ठेवल्याचे समोर आले आहे.
5 / 10
तुनिषा त्याला वारंवार मेसेज करायची, पण शिजानने तिला उत्तर दिले नाही. तुनिषाच्या आईने तिच्या रेकॉर्ड केलेल्या जबाबात म्हटले आहे की, शिजानने २४ डिसेंबर रोजी या मालिकेच्या सेटवर तुनिषाला थप्पड मारली होती.
6 / 10
याशिवाय, आरोपी तुनिषाला उर्दू शिकण्यास आणि हिजाब घालण्यास सांगत असे, हे देखील पोलिसांनी उघड केले आहे, परंतु अद्याप याची पुष्टी होणे बाकी आहे.
7 / 10
अधिकाऱ्यांनी पुढे दावा केला की, फुटेजनुसार, तुनिषा आत्महत्या करण्यापूर्वी शिजानच्या मेकअप रूममध्ये गेली आणि काही वेळाने बाहेर आली. त्यानंतर शिजान सेटवर गेल्याचे आणि तुनिषा त्याच्या मागे गेल्याचे दिसले, पण सेटच्या गेटवर पोहोचल्यानंतर ती तिच्या मेकअप रूममध्ये परतली.
8 / 10
सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी उघड केले की, शिजान आणि तुनिषा यांच्यात काही संशयास्पद संभाषण होते. परंतु आरोपीने ते नाकारले आहे.
9 / 10
पोलिसांनी न्यायालयाकडे ५ दिवसांची कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने आरोपी शिजानला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
10 / 10
शिजानची पोलिस कोठडी बुधवारी संपणार होती, मात्र पोलिसांनी त्याची चौकशी आणि तपास पूर्ण केला नव्हता, त्यामुळे त्यांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती.
टॅग्स :तुनिशा शर्मा