Join us

Tunisha Sharma Case: शीजानसोबत तुनिषानं का केलं ब्रेकअप?, पोलिसांच्या चौकशीत झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 1:13 PM

1 / 9
अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलीस गुंतले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेली अभिनेत्री तुनिषा शर्माचा सहकलाकार शीझान मोहम्मद खान याने पोलीस चौकशीत मोठा खुलासा केला आहे.
2 / 9
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजान खानने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबानीत दोघांचे ब्रेकअप का झाले हे उघड झाले आहे.
3 / 9
चौकशीदरम्यान शीजान मोहम्मद खानने कबूल केले की हे दोन्ही कलाकार एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
4 / 9
तुनिषा प्रकरणात पोलीस चौकशीत आरोपी शीजान मोहम्मद खानने सांगितले की, दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असून त्यांच्या वयात मोठा फरक आहे. याच कारणामुळे शीजानने तुनिषा शर्मासोबत ब्रेकअप केले.
5 / 9
शीजान मोहम्मद खानने सांगितलेल्या या गोष्टीवर पोलिसांचा विश्वास बसत नाहीये.
6 / 9
खरं तर, अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांनी शीजानवर फसवणूक केल्याचा आणि एकाच वेळी अनेक मुलींशी संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. त्याला टाळण्यासाठी शीजान वय आणि धर्माचे कारण देत आहे.
7 / 9
तुनिषा शर्माच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, शीजानने मृत्यूच्या १५ दिवस आधी तुनिषाशी ब्रेकअप केले होते. याच कारणामुळे १६ डिसेंबर रोजी तुनिषाला अटॅक आला होता. त्यानंतर तुनिषाला रुग्णालयात दाखल करावे लागले.
8 / 9
शीजानने आपली फसवणूक केल्याचे तुनिषाने रुग्णालयात सांगितले होते.
9 / 9
२४ डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषाने मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये आत्महत्या केली होती. तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालातही तुनिषाचा मृत्यू फासामुळे गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
टॅग्स :तुनिशा शर्मा