By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:37 IST
1 / 10टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी तिच्या शोच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्रीने दुपारचे जेवण केले आणि नंतर को-स्टार शीझान खानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. तुनिशाच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आणि खळबळ उडाली. 2 / 10अभिनेत्रीच्या आईने शीझान खानवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच शीझानला अटक करण्यात आली. त्याच वेळी, आता तुनिशाच्या आईने एका मुलाखतीदरम्यान मुलीचा ऑडिओ मेसेज ऐकवला आहे आणि शीझानची ड्रग टेस्ट करण्याची मागणी करण्याबरोबरच अनेक गंभीर आरोप केले.3 / 10अलीकडेच तुनिशा शर्माच्या आईने एका मुलाखतीदरम्यान शीझान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वनिता शर्मा म्हणाल्या, 'माझे आयुष्य संपले. मला एकच मूल होतं. मी शीझानला सोडणार नाही. मी माझी मुलगी गमावली आहे. मी न्याय मिळवण्यासाठी आले आहे. शीझान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब यात सामील आहे.' 4 / 10'तुनिशा माझं आयुष्य होती. गेल्या 3-4 महिन्यांपासून ती शीझानच्या कुटुंबाच्या जवळ आली गेली होती. मी तुनिशाला पैसे दिले नाहीत, असं आता शीझानची आई सर्वांना सांगत आहे. पण गेल्या तीन महिन्यांत मी तिला तीन लाख रुपये दिले होते. आपण हे पाहू शकता' असं तुनिशाच्या आईने म्हटलं आहे. 5 / 10पुढे वनिता शर्मा म्हणाल्या, 'शीझान ड्रग्ज घेत असे आणि त्याने माझ्या मुलीलाही व्यसनाधीन केलं होतं. माझी मुलगी सिगारेट कधीच ओढत नसे, पण त्यामुळे ती धूम्रपान करू लागली. शीझान ड्रग्ज घेतो, असे तुनिशाने तिच्या मित्रांना सांगितले होते. शीजनची ड्रग टेस्ट करून सर्व रिपोर्ट मला द्यावेत अशी माझी इच्छा आहे.'6 / 10'ब्रेकअपनंतरही तुनिशा तुटली होती. आपली फसवणूक झाल्याचे ती म्हणायची. शीझानची आई सुद्धा तुनिशासोबत त्याच्या प्रेयसीबद्दल बोलून तिला त्रास द्यायची.' वनिता शर्मा यांनी तुनिशाचा एक व्हॉईस मेसेजही सांगितला. 7 / 10व्हॉईस मेसेज तुनिशा 'मम्मा मी तुला सांगू शकत नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करते. तू माझ्यासाठी जे काही करतेस ते मी तुला सांगू शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी लवकरच घरी येईन आणि मग तुझ्यासोबत झोपेन'' असं आपल्या आईला सांगत आहे. 8 / 10शीझानचे कुटुंबीय सांगत आहेत की, मी तुनिशाला कामासाठी भाग पाडलं. मी हे केलं असतं तर तिने 12-12 तास काम केलं नसतं. मी तुनिशाच्या वडिलांना वचन दिले होते की मी तिला कधीही कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मी माझ्या मुलाला कधीही ओरडली देखील नाही असंही म्हटलं. 9 / 10तुनिशाच्या आईने सांगितले की, ती शीझान खानच्या कुटुंबावर खूप जास्त खर्च करू लागली होती. लडाखहून परत आल्यानंतर मी तुनिशाला तिच्या शोवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. तुनिशाच्या शूटिंगनंतर शीझानची बहीण आणि आई तिला त्यांच्याकडे बोलवायच्या.10 / 10तुनिशा शीझानच्या कुटुंबावर इतका खर्च करू लागली होती की तिने तिच्या मित्रांकडे पैसे उधार मागायला सुरुवात केली होती. तुनिशा म्हणाली की मम्मा 3 बीएचकेसाठी 20 लाख भाडं आहे म्हणून मी ते दिले. तिने सनरूफ असलेली कार मागितली, मी ती दिली असंही आईने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.