Tunisha Sharma : "तुनिशाकडे नसायचे पैसे, तिने माझ्याकडे 3 हजार उधार मागितलेले"; मैत्रिणीचा मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 5:21 PM1 / 11अभिनेत्री तुनिषा शर्माने तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी शीझान खानने मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तेव्हापासून शीझान खान पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 2 / 11तुनिषा शर्माच्या मैत्रिणीने अभिनेत्रीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आज तक' या न्यूज पोर्टलशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. तुनिषा शर्माची मैत्रीण आणि माजी को स्टार असलेल्या सोनिया सिंहने खुलासा केला की तुनिशा काही आठवड्यांपासून नाराज होती, त्यामुळे तिच्याशी कमी बोलणं व्हायचं. 3 / 11डिसेंबरमध्ये सोनिया आणि तुनिशा एकमेकींना भेटल्या होत्या, त्या दरम्यान तुनिशाने दावा केला होता की, शीझानने रिलेशनशिपमध्ये स्पेस मागितली होती. मी तिला तेव्हा समजावून सांगितले की अशा गोष्टी नात्यात घडत असतात. तुनिशाला अनेकदा पैशांची कमतरता भासत असल्याचा खुलासाही सोनियाने केला. 4 / 11'तुनिशाकडे अनेकदा पैसे नसायचे. काही दिवसांपूर्वी तिने माझ्याकडे 3000 रुपये उधार मागितले होते, मग मी तिला विचारलं की काय झालं इतकेही पैसे नसायला. तुनिशाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिने फोन केला होता आणि आपण तिच्यासोबत असल्याचे तिच्या आईला खोटं सांगण्यास सांगितलं होतं' असंही सोनिया म्हणाली.5 / 11टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. शीझान खानच्या मेकअप रूममध्ये ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तुनिशाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने शीझानविरुद्ध गुन्हा दाखल केला. शीझान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 6 / 11शीझानची आई आणि बहिणीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांवर खुलासा केला आहे. शीझान खानच्या आईने सांगितले की, 'तुनिशा माझ्या मुलीसारखी होती. आम्ही कधीही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. तुनिशा मला अम्मा म्हणायची... शीझानवरचे आरोप चुकीचे आहेत.' 7 / 11शीझानच्या बहिणीने तुनिशासोबत बहिणीसारखेच संबंध असल्याचं म्हटलं आहे. त्याला दर्ग्यात नेण्याची बाब चुकीची आहे. आम्ही तुनिशाला खूप आनंद दिला होता असंही सांगितलं. तुनिशासोबत आमचे संबंध खूप चांगले होते, असे शीझान खानच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. 8 / 11आम्ही जो धर्म मानतो तो आमचा पर्सनल असतो. आम्ही कोणावर दबाव आणत नाही, दर्गा आणि हिजाबची चर्चा चुकीची आहे. व्हायरल होत असलेला हिजाबचा फोटो शोमधील आहे असंही म्हटलं आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला असून खळबळ उडाली आहे. 9 / 11शीझानच्या वकिलांनी यानंतर आता गंभीर आरोप केला आहे की, तुनिशाचे तिच्या कुटुंबियांशी चांगले संबंध नव्हते. एवढेच नाही तर अभिनेत्रीच्या आईने तिचा गळा दाबला होता. शीझान खानच्या वकिलाने पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, तिच्या आईने तुनिशाचा गळा दाबला होता.10 / 11तुनिशाने ही गोष्ट मालिकेच्या दिग्दर्शकालाही सांगितली होती ज्यामध्ये ती त्यावेळी काम करत होती. याशिवाय तिने आपल्या आईचा मित्र असलेल्या संजीव कौशलचाही उल्लेख केला. वकिलाचे म्हणणे आहे की, तुनिशा संजीवला घाबरत होती. संजीवमुळे एंग्जाइटी इश्यू होता आणि याच कारणामुळे ती तिचा मित्र कंवर ढिल्लोसोबत तीन महिने राहिली. 11 / 11शीझानच्या वकिलाचा असाही दावा आहे की, तिची आई तुनिशाच्या कष्टाची कमाई स्वत:कडे ठेवायची आणि तिने तिला त्यातला एक पैसाही दिला नाही. पैशांसाठी तुनिशाला वारंवार आईसमोर हात पसरायची. तसेच आई वनिता शर्मा तुनिशाला पैसे मागितल्यावर खूप प्रश्न विचारत असे. आणखी वाचा Subscribe to Notifications