Tunisha Sharma: शीजान त्यादिवशी मिस्ट्री गर्लसोबत दीड तास बोलला; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 4:58 PM1 / 6अवघ्या २० वर्षांच्या गुणवान अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं आणि टेलिव्हिजन विश्वात एकच खळबळ उडाली. तुनिषा शर्मा हिनं २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केली. कालच तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषा आज या जगात नसली तरी तिच्या आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस नवं वळण मिळताना दिसत आहे. पोलिसांना आता नवी माहिती मिळाली आहे.2 / 6तुनिषा शर्माच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप सहकलाकार आणि तिचा एक्स-बॉयफ्रेंड शीजान खान याच्यावर आहे. शीजाननं आपल्या मुलीला फसवलं असा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे. शीजानचे आणखी काही मुलींशी संबंध होते आणि याची माहिती तुनिषाला मिळाल्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं होतं. याच तणावात तुनिषानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.3 / 6पोलिसांनी आता शीजानच्या चौकशीत त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा शोध लावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वालीव पोलिसांनी संबंधित मुलीची ओळख पटवली आहे. पण तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. तसंच शीजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करण्याचं काम केलं जात आहे.4 / 6पोलीस तपासादरम्यान तुनिषाने जेव्हा आत्महत्या केली, त्यादिवशी शीजानने सीक्रेट गर्लफ्रेंडसोबत जवळपास एक ते दीड तास बातचीत देखील केली होती. याचा तपास देखील पोलिसांनी आता सुरु केला आहे. 5 / 6सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी तुनिषाने शेअर केली होती. 6 / 6तुनिषा शर्माचा जन्म ४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या १४व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications