Tunisha Sharma: तुनीषा शर्माच्या टॅटूने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष; पोस्ट होतेय व्हायरल, पण काय लिहिलं होतं?, पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 3:00 PM1 / 7 टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचा सहकलाकार मोहम्मद शिझान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. 2 / 7शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती. तुनिषा शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असायची. तुनिषाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 3 / 7तुनिषाने तिच्या मनगटावर प्रेमाशी संबंधित शब्दांचा टॅटू काढला आहे. 'Love Above Everything' असं तिने मनगटावर लिहिलं होतं. तिच्या टॅटूने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.4 / 7 सदर प्रकरणाबाबत खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजूने पोलीस तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची पोलीस चौकशी करत असल्याची माहिती वालीव पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र तुनीषा शर्माच्या आईने शीजान खानवर गंभीर आरोप केले आहे. 5 / 7 तुनीषा शर्मा तिच्या आईसोबत मुंबईत राहायची. आईने तुनीषाचा मित्र शीजानवर आरोप केला आहे. शीजानला कंटाळून तुनीषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनीषाच्या आईने केला आहे. दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शीजानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अली बाबा या टीव्ही शोमध्ये शीजान हा तुनीषाचा सहकलाकार होता.6 / 7सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनीषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी तुनीषाने शेअर केली होती. 7 / 7तुनीषा शर्माचा जन्म ४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये झाला.लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या १४व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications