IN PICS : 20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...! By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:53 AM1 / 10टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा आज आपल्यात नाही. काल अवघ्या 20 वर्षाच्या तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली.2 / 10तुनिषा काल मालिकेच्या सेटवर आली, सगळ्यांची भेटली बोलली आणि अचानक सेटवरच तिने मृत्युला कवटाळलं.3 / 10येत्या 4 जानेवारीला तुनिषाचा वाढदिवस होता. ती 21 वर्षांची होणार होती, पण त्याआधीच तिने जगातून एक्झिट घेतली.4 / 10तुनिषा ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत मुख्य भुमिकेत होती. या मालिकेनं तिला अपार लोकप्रिय मिळवून दिली.5 / 10तुनिषा चंदीगडमध्ये जन्मली. तिथेच शिकली आणि मग अॅक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आली. इथे येऊन तिने केवळ नावचं नाही तर संपत्तीही कमावली.6 / 10रिपोर्टनुसार, आपल्या छोट्याशा करिअरमध्ये तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. अगदी फितूर, बार बार देखो, कहानी 2, दबंग 3 अशा अनेक सिनेमातही तिने छोट्या छोट्या भूमिका साकारली.7 / 10रिपोर्टनुसार, 20 वर्षाची तुनिषा कोट्यवधी रूपयांची मालकीण होती. ती 2 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 15 कोटींच्या संपत्तीची मालकीण होती.8 / 10अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा शर्मा तिच्या आलिशान घराची मालकिन होती. तुनिषाच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अलिशान गाड्यांमधून ती फिरायची. 9 / 10तुनिषाला लहानपणापासूनच डान्स आणि अॅक्टिंगची आवड होती. ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या मालिकेतून तिने डेब्यू केला होता.10 / 10इंटरनेटवाला लव्ह, शेर ए पंजाब महाराजा रंजीत सिंह, इश्क सुभानअल्लाह अशा मालिकांत तिने काम केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications