माझी तुझी रेशीमगाठ: 'अपने पास बहोत पैसा है' म्हणत मायलेकीने केलं क्यूट फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 11:35 IST
1 / 7छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे.2 / 7या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत मायरा वायकुळ ही बालकलाकारही झळत आहे. विशेष म्हणजे ही मायरा प्रेक्षकांची लाडकी ठरत असून तिची प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. 3 / 7मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर स्टेवरही प्रत्येकाची लाडकी आहे. त्यामुळेच श्रेयस किंवा प्रार्थना तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.4 / 7अलिकडेच प्रार्थनाने 'डॉटर्स डे'च्या निमित्ताने मायरासोबत खास फोटोशूट केलं आहे. या दोघी मायलेकींनी सेम लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे. 5 / 7ऑनस्क्रीन मायलेकी असलेल्या या दोघींनी सेम कपडे परिधान करुन केलेलं हे फोटोशूट प्रेक्षकांना चांगलंच आवडलं आहे. त्यामुळे सोशल मीडयावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.6 / 7 या फोटोमध्ये मायरा आणि प्रार्थनाने सेम व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे. या टी-शर्टवर मालिकेतील परी आणि नेहाचा स्पेशल डायलॉग 'अपने पास बहोत पैसा है' असं लिहिलेलं आहे.7 / 7प्रार्थना आणि श्रेयशने खूप वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ही मालिका मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. या कलाकरांच्या अभिनयासोबत मायराचा गोड अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.