अभिनेत्याला स्टेज ४ कॅन्सर! गेल्या तीन वर्षांपासून आजाराचा करतोय सामना, आता पैसेही संपले, झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:05 IST
1 / 11टीव्ही अभिनेत्री हिना खाननंतर आता आणखी एक अभिनेता कॅन्सर या गंभीर आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्ही अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे. 2 / 11विभू राघव असं या अभिनेत्याचं नाव असून त्याला स्टेज ४चा कॅन्सर आहे. २०२२ मध्ये विभू राघवला कॅन्सरचं निदान झालं होतं. 3 / 11व्हिडिओ शेअर करत त्याने चाहत्यांना त्याच्या या आजाराबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासून अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे. 4 / 11विभू राघव Colon Cancer (आतड्याचा कॅन्सर) ने ग्रस्त आहे. त्याचा कॅन्सर लास्ट स्टेजवर पोहोचला आहे. 5 / 11गेल्या तीन वर्षांपासून तो कॅन्सरवर उपचार घेत आहे. मात्र याचा खर्च जास्त असल्याने आता त्याच्याकडचे पैसेही संपले आहेत. 6 / 11विभू राघवच्या उपचारासाठी आणि त्याला मदत व्हावी म्हणून आता सिनेइंडस्ट्रीतील कलाकार पुढे येत आहेत. 7 / 11अभिनेत्री सिंपल कौल आणि दलजीत कौरने अभिनेत्याला मदत करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे. 8 / 11याआधीही विभू राघवच्या मित्रांनी आणि कलाकारांनी त्याला पैशाची मदत केली होती. मात्र त्याच्या उपचारासाठी आणखी पैशांची आवश्यकता आहे. 9 / 11विभू राघवने व्हिडिओत सांगितलं होतं की कॅन्सर त्याच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. लिव्हर, हाडे आणि फुप्फुसांपर्यंत कॅन्सर पसरला आहे. 10 / 11यावर केवळ केमोथेरेपी हा एकमेव उपचार असल्याचं अभिनेत्याने सांगितलं होतं. 11 / 11'निशा और उसके कझन्स' मालिकेत अभिनेता दिसला होता.