घटस्फोटानंतर चार महिन्यात हा अभिनेता करतोय दुसरं लग्न, इजिप्तच्या जर्नलिस्टवर जडलं प्रेम By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 5:51 PM1 / 8मधुबाला आणि शक्ती- अस्तित्व के एहसास की यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता विवियन डीसेना याचा चारच महिन्यांआधी घटस्फोट झाला. आता काय तर विवियन पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे.2 / 8विवियन आणि टीव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजी यांनी गतवर्षी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला होता. त्याआधी 2017 मध्ये या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. आता विवियन इजिप्तच्या एका माजी पत्रकारासोबत लग्नगाठ बांधणार आहे.3 / 8विवियन दीर्घकाळापासून इजिप्तची माजी पत्रकार नौरान अली हिला डेट करतोय आणि लवकरच तिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. 4 / 8नौरानने एका मुलाखतीसाठी विवियनसोबत संपर्क साधला होता. मग दोघांची भेट झाली आणि पुढे दोघं प्रेमात पडले. अर्थात ही लव्हस्टोरी इतकी साधीसोपी नव्हती.5 / 8नौरान पहिल्यांदा विवियनला भेटली तेव्हा, हा स्वत:ला समजतो कोण? अशी त्याची प्रतीमा तिच्या मनात तयार झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांत खटके उडाले होते. अगदी मी तुझ्यासारख्या माणसाला सहन करू शकत नाही, असं नौराननं विवियला तोंडावर सुनावलं होतं.6 / 8यावर, न ओळखता मला जज करू नकोस, असं विवियनचं उत्तर होतं. यानंतर विवियनला ओळखता ओळखता नौरान त्याच्या प्रेमात पडली.7 / 8विवियनने सांगितल्यानुसार, नौरानने आता तिची नोकरी सोडली आहे आणि गृहिणी बनणं हा तिचा निर्णय आहे. नौरानला एका सामान्य जोडप्यासारखं वैवाहिक आयुष्य हवं आहे.8 / 8मी तिला कोणत्याही इव्हेंटमध्ये सोबत घेऊ जाऊ नये, अशी नौरानची इच्छा आहे. कारण ती माझ्यापेक्षाही अधिक प्रायव्हेट पर्सन आहे, असंही विवियनने सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications