Join us

गोपी बहूचं डोहाळेजेवण! फुग्यांचं डेकोरेशन अन् साधा लूक, देवोलिनाच्या बेबी शॉवरचे खास फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 5:07 PM

1 / 8
साथ निभाना साथिया या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गोपी बहू लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने काही दिवसांपूर्वीच ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
2 / 8
आता नुकतंच देवोलिनाचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
3 / 8
देवोलिनाच्या बेबी शॉवरला फुग्यांचं डेकोरेशन करण्यात आल्याचं फोटोत दिसत आहे. तर अभिनेत्रीने डोहाळेजेवण कार्यक्रमासाठी पारंपरिक लूक केला आहे.
4 / 8
बदामी रंगाची साडी नेसून देवोलिनाने अत्यंत साधा लूक केला होता. तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नंन्सी ग्लो फोटोतही स्पष्ट दिसत आहे.
5 / 8
कुटुंबीय आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत देवोलिनाचा हा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला.
6 / 8
अभिनेत्री पती शाहनवाज शेखसोबत फोटोसाठी खास पोजही दिल्या. तसंच बेबी बंपही फ्लॉन्ट केला.
7 / 8
देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती.देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे.
8 / 8
लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.
टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीटिव्ही कलाकारप्रेग्नंसी