'तारक मेहता...' मालिकेला मिळाली नवी दयाबेन? 'या' टीव्ही अभिनेत्रीचा लूकमधील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 17:06 IST
1 / 8'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलंसं केलं.2 / 8मालिकेतील दयाबेन ही भूमिका प्रचंड गाजली. अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) हे पात्र साकारलं होतं. दयाबेनचा आवाज, बोलण्याची स्टाईल, तिचा हटके गरबा सगळंच धमाल होतं. 3 / 8दिशा वकानीने २०१८ मध्ये मॅटर्निटी लीव्ह घेतली. म्हणून ती काही काळ मालिकेत दिसणार नाही हे निश्चित होतं. मात्र दिशा पुन्हा कधीच मालिकेत परत आली नाही.4 / 8दिशा कमबॅक करणार अशी अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत चर्चा होती. मात्र दिशाने पहिल्या बाळानंतर काही वर्षांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यामुळे तिची मालिकेत परत येण्याची चिन्हच धुसर झाली.5 / 8दिशाची दयाबेनच्या भूमिकेत सगळेच आठवण काढतात. तिच्यासारखं दुसरं कोणी हे पात्र साकारणं खूप कठीण आणि आव्हानात्मक आहे. निर्माते असित मोदींनी दयाबेनच्या भूमिकेसाठी अनेक ऑडिशन घेतल्या.6 / 8या ऑडिशन्समधून एक अभिनेत्री आता फायनल झाल्याची चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री काजल पिसाळचा (Kajal Pisal) दयाबेनच्या लूकमधला फोटो आता व्हायरल झाला आहे.7 / 8काजल यामध्ये हात जोडून उभी आहे. तिने दयाबेनसारखीच साडी नेसली आहे आणि दागिने घातले आहेत. तिची हेअरस्टाईलही तशीच आहे. हा फोटो ऑडिशनचा असल्याचा अंदाज आहे. अद्याप निर्मात्यांकडून तिच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी इतक्या वर्षांपासून मालिकेतून गायब असलेलं दयाबेनचं पात्र परत येणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत. 8 / 8काजलने 'साथ निभाना साथिया','बडे अच्छे लगते है','एक हजारो मे मेरी बहना है','एक मुठ्ठी आसमान','नागिन ५' या मालिकांमध्येही दिसली आहे.