Join us  

बॉलिवूडच काय साऊथमध्येही तेच, सनाया ईरानीने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रसंग; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 1:31 PM

1 / 8
'इस प्यार को क्या नाम दूँ' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री आहे सनाया ईरानी. या मालिकेतील तिची खुशी ही भूमिका प्रचंड गाजली. तसंच तिची आणि अर्णव सिंह रायजादाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. आजही ही मालिका आवडीने पाहिली जाते.
2 / 8
सनाया ईरानीने 'मिले जब हम तुम' या मालिकेतही काम केलं होतं. स्टार वन वरील ही मालिका तेव्हाची तरुणाईची लाडकी मालिका होती. यात सनायाची जोडी सम्राट ही भूमिका साकारणाऱ्या मोहित सेहगसोबत होती. दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्न केलं.
3 / 8
सनायाने 2006 साली यशराज फिल्म्सच्या 'फना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यात ती अगदीच छोट्या भूमिकेत दिसली. सनायाने 'दम मारो दम','वेद अँड आर्या','घोस्ट' या सिनेमांमध्येही काम केलं.
4 / 8
दरम्यान सनायाला टीव्ही क्षेत्रात जसं यश मिळालं तर अद्याप सिनेमांमध्ये मिळालं नाही. तिला हवे तसे रोल सिनेमांमध्ये मिळू शकले नाहीत. इतकंच नाही तर तिने कास्टिंग काऊचचाही सामना केला. एका मोठ्या दिग्दर्शकाने तिला बोलवून तिचा अपमान केला. फक्त बॉलिवूड नाही तर साऊथमध्येही तिने याचा सामना केला.
5 / 8
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली,'एकदा दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मला भेटायला बोलावलं होतं. मला तेव्हा सिनेमात काम करायचं नव्हतं पण तरी मी भेटायला गेले होते. तेव्हा काही वेळ माझ्याशी बोलल्यानंतर ते मला म्हणाले की आम्हाला फुलर बॉडी असलेली अभिनेत्री हवी आहे. मी थक्क होऊन म्हणाले, 'म्हणजेच मी फुलर व्यक्ती नाहीए.'
6 / 8
तेव्हा मला हेच वाटलं की हे लोक मुद्दामून बोलवतात. या लोकांना गप्पा मारुन बघायचं असतं की ही तडजोड करण्यासाठी म्हणजेच शारिरीक संबंधांसाठी तयार आहे की नाही.
7 / 8
नंतर मला एका बॉलिवूडमधील मोठ्या दिग्दर्शकाने मला फोन करायला सांगितलं होतं. आधी मी तयार नव्हते पण त्याच्या सेक्रेटरीने खूपच विनंती केली म्हणून मी त्यांना फोन केला. तर त्याने मला खूपच अॅटिट्यूड दाखवला. त्याने मला काही वेळाने फोन करायला सांगितला होता. मी काही वेळाने कॉल केला तर तो म्हणाला ही काय वेळ आहे का?
8 / 8
मीही त्याला जशास तसं उत्तर दिलं होतं. नंतर तो मला म्हणाला एक फिल्म आहे ज्यात बरेच बॉलिवूड हिरो आहेत. त्यात तुला बिकीनी घालावी लागेल. मी विचारलं पण माझी भूमिका नक्की काय आहे? यावर तो म्हणाला तुला बिकीनी घालणं जमणार आहे का? तो खूपच rude बोलत होता त्यामुळे मी लगेच फोन ठेवून दिला.
टॅग्स :सनाया ईरानीटिव्ही कलाकारकास्टिंग काऊचटेलिव्हिजनबॉलिवूड