त्याच्यासाठी मालिकाच नाही तर अभिनयही सोडणार, ‘उड़ान’ फेम अभिनेत्री करतेय लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 5:58 PM1 / 9चिडीयाघर आणि उडान या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शीतल पांड्या लवकरच बॉयफ्रेन्ड अभिषेक भट्टाचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. विशेष म्हणजे एका आठवड्यातच ती दुसºयांदा लग्न करते आहे. 2 / 9 उड़ान फेम अभिनेत्री शीतल पांडेने नुकतेच कोर्ट मॅरेज केले होते. आता ती विधिवत आणि थाटामाटात लग्न करणार आहे.3 / 913 नोव्हेंबरला शीतल पांडेय आपला लहानपणापासूनचा मित्र अभिषेक भट्टाचार्यसोबत लग्नबंधनात अडकली. तिने कोर्ट मॅरेज केले होते.4 / 9कोर्ट मॅरेज फक्त व्हिजासाठी मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी केलेले लग्न होते, असे शीतलने स्पष्ट केले आहे.5 / 9आता शीतल आणि अभिषेक 20 नोव्हेंबरला पुन्हा लग्न करणार आहेत. हे लग्न ट्रेडिशनल पद्धतीने असणार आहे.6 / 9 लग्न मुंबईतच गोरेगावमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे.7 / 9अभिषेक डॉक्टर आहे आणि त्याच्यासोबत संसार थाटण्यासाठी शीतल मालिकाही सोडायला तयार आहे. 8 / 9फक्त मालिकाच नाही तर अभिनय क्षेत्रालाचा बायबाय करण्याच्या तयारीत आहे. यानंतर ती डान्स शिकणार आहे आणि डान्स शिकवणार आहे.9 / 9शीतल आणि अभिषेक दोघांचाही साखरपुडा डिजीटल पद्धतीने झाला होता. यूएसएमध्ये तिचा साखरपुडा होणार होता. खरे तर यूएसएमध्ये तिचा साखरपुडा होणार होता. मात्र कोरोना महासाथीमुळे त्यांनी व्हिडीओ कॉलवर त्यांनी आपला साखरपुडा आटोपला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications